मुद्रा – सौंदर्योपचारांतून नवी दिशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

कॉस्मेटिक आणि एस्थेटिक मेडिसिन क्षेत्रात गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणाऱया डॉ. अक्षया जैन यांनी एस्थेटिक कॉस्मेटोलॉजी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्वचा आणि केसांच्या उपचारांना नवी दिशा देत त्यांनी अनेक रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. कास्मेटिक आणि एस्थेटिक मेडिसिन क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. अक्षया जैन यांनी पुण्यातील विश्वासार्ह एस्थेटिक कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ‘स्किनटिलेटिंग’ या क्लिनिकमार्फत त्वचा आणि केसांच्या उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञानाधारित सेवा दिल्या जातात. अँटी-एजिंग, स्किन रीजुव्हनेशन, हेअर रिस्टोरेशन तसेच विविध एस्थेटिक उपचारांसाठी आधुनिक लेसर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

एस्थेटिक्स आणि वेलनेस क्षेत्रातील संरचित शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन डॉ. अक्षया जैन यांनी क्रोमोकोस्मो इन्स्टिटय़ूट ऑफ एस्थेटिक्स, ट्रायकॉलॉजी अँड न्यूट्रिशन (CIATN) या संस्थेची स्थापना केली. ‘स्किल इंडिया’अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात नोंदणीकृत असलेली ही संस्था एस्थेटिक मेडिसिन, ट्रायकॉलॉजी आणि क्लिनिकल न्यूट्रिशन या क्षेत्रांमध्ये प्रमाणित व नियमसंगत शिक्षण देणारे केंद्र म्हणून ओळखली जाते.

CIATN येथे डॉक्टर आणि नॉन-डॉक्टर दोघांसाठीही विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्था एस्थेटिक्सचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रशिक्षण देते. एस्थेटिक्स आणि वेलनेस क्षेत्रात करीअर घडवू इच्छिणाऱया, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करू इच्छिणाऱया किंवा उद्योजक बनण्याची इच्छा असलेल्यांसाठी हे अभ्यासक्रम खुले आहेत.

शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच ण्घ्Aऊऱ कडून इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य आणि व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शनही दिले जाते. पदवीधरांना एस्थेटिक क्लिनिक, डर्मेटोलॉजी केंद्रे, हेअर रिस्टोरेशन सुविधा आणि वेलनेस क्लिनिकमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात, अशी माहिती डॉ. अक्षया जैन यांनी दिली. एस्थेटिक मेडिसिनसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये CIATN सारख्या संस्था भारतातील आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील नियमबद्ध व कौशल्याधारित शिक्षणाच्या वाढत्या प्रवाहाचे प्रतीक ठरत आहेत. या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026’ शिखर परिषदेत स्किनटिलेटिंग आणि क्रोमोकोस्मो इन्स्टिटय़ूट ऑफ एस्थेटिक्स, ट्रायकॉलॉजी अँड न्यूट्रिशन (ण्घ्Aऊऱ) यांच्या संस्थापक डॉ. अक्षया जैन यांना ‘एस्थेटिक मेडिसिन आणि कौशल्य विकास क्षेत्रातील लिडर’ हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एस्थेटिक मेडिसिन आणि संरचित व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

दरम्यान, CIATN च्या आगामी बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून एस्थेटिक मेडिसिन आणि वेलनेस क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱया इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे डॉ. अक्षया जैन यांनी सांगितले.