
मुंबई गोदीमध्ये 14 एप्रिल 1944 रोजी एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीमध्ये महाप्रचंड स्फोट होऊन झालेल्या अग्निप्रलयात मुंबई अग्निशमन दलाचे 66 बहादूर जवान व अधिकारी यांनी प्राणाहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जिगरबाज जवानांना अग्निशमन दलाकडून सलाम करण्यात आला.
अग्निशमन या कार्यक्रमाअंतर्गत 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षा विषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अग्निसुरक्षा रॅली, अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन, अग्निसुरक्षा विषयी जनजागृती संबंधी भित्तीपत्रकांचे वाटप, व्याख्याने व प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.



























































