संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधकांची बैठक, संजय राऊत यांची पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
opposition-meeting-for-parliament-special-session-sanjay-raut-social-media-post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी X अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये संसदेतील विरोधीपक्षांचे नेते एकत्र बैठक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘महिला आरक्षण (सुधारणा) विधेयक’ आणि ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ यासंदर्भात संयुक्त रणनीती आखण्यासाठी बैठक सुरू असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनासाठी (१६-१८ एप्रिल) संयुक्त रणनीती आखण्याकरिता विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा या अधिवेशनामध्ये ‘महिला आरक्षण (सुधारणा) विधेयक’ आणि ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ मंजूर करण्याचा मानस आहे.