
शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया रखडणार अशी भीती व्यक्त केली जात आहे, मात्र ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची नसल्याने कर्जमाफीला आचारसंहितेची अडचण भासणार नाही असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 25 जूनपर्यंत ती संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच काळात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने, आचारसंहितेच्या नियमांमुळे ही प्रक्रिया रखडेल अशी शंका उपस्थित होती. परंतु आचारसंहितेची काहीच अडचण येणार नाही असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.




























































