Ratnagiri News – बाळ मानेंची गद्दारी, शिवसैनिकांमध्ये संताप; सोशल मिडियावर उमटल्या तीव्र भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड-रत्नागिरी-सिधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विश्वासघात करणाऱ्या बाळ माने यांना शिवसैनिकांनी गद्दार संबोधत वाभाडे काढले आहेत.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून बाळ माने यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेचे निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सून शिवानी माने यांना उमेदवारी दिली गेली. तत्पूर्वी पक्षाने त्यांना उपनेते पद देऊन कोकणची जबाबदारी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला आणि अखेरच्या दिवशी निवडणूकीतून माघार घेतल्याने बाळ माने यांनी विश्वासघात केल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. सोशल मिडियावर शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.