
झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गुरुवारी एका कोळसावाहू मालगाडीचे 15 डबे रुळावरून घसरले. यामुळे डाल्टनगंज आणि गढवा रोड जंक्शन दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. धनबाद विभागांतर्गत येणाऱ्या राजहारा स्थानकाजवळ दुपारी 1 वाजता मालगाडी अप लाईनवर वळवली जात असताना ही घटना घडली. रुळावरून हे डबे हटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मालगाडी अप-लाईनवर वळवली जात असताना तिचे 15 डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, असे अधिकाऱ्याने पुढे नमूद केले. या ताफ्यात दोन लांब पल्ल्याच्या मालगाड्यांचा समावेश होता, ज्यामध्ये एकूण 116 डबे होते, अशी माहिती पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) सरस्वती चंद्र यांनी दिली.

























































