
आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुना पॅनेल काढून टाकण्यासाठी शनिवार 6 जून ते रविवार 7 जून या कालावधीत आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. CSMT-कल्याण विभागातील मुख्य मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक नाही.
आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन एनई मार्गांवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
ब्लॉक सुरू होण्यापूर्वी 6 जून रोजी कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 10.16 वाजता सीएसएमटीवरून सुटेल. ब्लॉक संपल्यानंतर 7 जून रोजी कसाऱ्याच्या दिशेने पहिली लोकल सायंकाळी 4.19 वाजता सीएसएमटीवरून सुटेल.
ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद राहिल. तसेच 6 जून रोजी काही उपनगरीय लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. 6 जून रोजी सीएसएमटीवरून 11.42 ते 8.44 या वेळेत सुटणाऱ्या सीएसएमटी-कसारा लोकल गाड्या आसनगाव येथेच थांबवण्यात येतील.
सीएसएमटीवरून रात्री 9.32 वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल खडवली येथेच थांबवण्यात येईल. सीएसएमटीवरून रात्री 10.47 वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल टिटवाळा येथेच थांबवण्यात येईल. मध्यरात्री 12.08 वाजता सीएसएमटीवरून सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल कल्याण येथेच थांबवण्यात येईल. 6 जून रोजी दुपारी 1.31 ते रात्री 10.00 या वेळेत कसारा येथून सुटणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकल गाड्या आसनगाव येथून सोडण्यात येईल.
ब्लॉकमुळे शनिवारी सुटणाऱ्या 11011 CSMT-धुळे एक्सप्रेस, 11012 धुळे-CSMT एक्सप्रेस,
12109 CSMT-मनमाड पंचवटी एक्सप्रेस आणि 12110 मनमाड-CSMT पंचवटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत 17611 हुजूर साहिब नांदेड-CSMT एक्सप्रेस मनमाड येथे, 12072 हिंगोली डेक्कन-CSMT जनशताब्दी एक्सप्रेस नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील, तर 17612 CSMT-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस मनमाड येथून आणि 12071 CSMT-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस नाशिक रोड येऊन सुटेल.
डाऊन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
ब्लॉक कालावधीत 12809 सीएसएमटी-हावडा मेल ही गाडी 6 जून रोजी रात्री 9.10 ऐवजी 7 जून रोजी मध्यरात्री 01.20 वाजता सुटेल.
- 12322 सीएसएमटी-हावडा मेल 6 जून रोजी रात्री 10.15 ऐवजी 7 जून रोजी मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल.
- 11057 सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस 6 जून रोजी रात्री 11.30 ऐवजी 7 जून रोजी दुपारी 02.00 वाजता सुटेल.
- 01079 सीएसएमटी-गोरखपूर स्पेशल ही गाडी 6 जून रोजी रात्री 10.30 ऐवजी 7 जून रोजी 04.00 वाजता सुटेल.
- 22177 सीएसएमटी-बनारस महानगरी एक्सप्रेस ही गाडी 7जून रोजी मध्यरात्री 12.15 ऐवेजी दुपारी 2.15 वाजता सुटेल.
- 02141 सीएसएमटी-नागपूर स्पेशल ही गाडी 7 जून रोजी मध्यरात्री 12.20 ऐवजी दुपारी 2.30 वाजता सुटेल.
- 18029 एलटीटी-शालिमार एक्सप्रेस 6 जून रोजी रात्री 10.00 ऐवजी 7 जून रोजी दुपारी 1.20 वाजता पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
- 12167 एलटीटी-बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस 6 जून रोजी रात्री 10.45 ऐवजी 7 जून रोजी दुपारी 1.45 वाजता पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
- 12141 एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेस 7 जून रोजी दुपारी 2.00 वाजता पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
- 12811 एलटीटी-हाटिया सुपरफास्ट एक्सप्रेस 7 जून रोजी दुपारी 2.15 वाजता पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
- 22538 एलटीटी-गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 7 जून रोजी दुपारी 2.30 वाजता पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
काही गाड्यांच्या मार्गात बदल
ब्लॉक कालावधीत 6 जून रोजी 11071 एलटीटी-बलिया कामायनी एक्सप्रेस, 01027 दादर-गोरखपूर विशेष गाडी, 15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस, 11001 सीएसएमटी-बल्लारशाह एक्सप्रेस, 12131 दादर-साईनगर एक्सप्रेस या गाड्या कल्याण-कर्जत-पुणे-साईनगर शिर्डी मार्गे वळवण्यात येतील. तर 17057 सीएसएमटी-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस कल्याण-कर्जत-पुणे-दौंड कॉर्ड लाइन-मनमाड मार्गे वळवण्यात येईल.
अप गाड्यांचे नियमन
- 01026 बलिया-दादर स्पेशल कसारा येथे 1 तास 45 मिनिटे थांबवण्यात येईल.
- 18030 शालिमार-एलटीटी एक्सप्रेसइगतपुरी येथे 50 मिनिटे थांबवण्यात येईल.
- 12810 हावडा-सीएसएमटी मेल इगतपुरी येथे 20 मिनिटे थांबवण्यात येईल.
- 20104 भटनी-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेसभुसावळ विभागात 10 मिनिटे थांबवण्यात येईल.
- 11082 गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेसभुसावळ विभागात आवश्यकतेनुसार थांबवण्यात येईल.
- 22537 गोरखपूर-एलटीटी कुशीनगर एक्सप्रेसभुसावळ विभागात आवश्यकतेनुसार थांबवण्यात येईल.
- 11062 जयनगर-एलटीटी एक्सप्रेसभुसावळ विभागात आवश्यकतेनुसार थांबवण्यात येईल.
- 01080 गोरखपूर-सीएसएमटी स्पेशल गाडी भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार थांबवण्यात येईल.
- 11203 नागपूर-मडगाव एक्सप्रेस भुसावळ विभागात 30 मिनिटे थांबवण्यात येईल.


























































