
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हिंदुस्थान-रशिया संबंध आणि अमेरिकेच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून सध्या तो प्रभावशाली आर्थिक विकास दर नोंदवत आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे. येत्या काही वर्षांत रशिया आणि हिंदुस्थानचा द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रशियासोबतच्या सहकार्यावरून अमेरिका हिंदुस्थानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हिंदुस्थान अशा प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पुतिन म्हणाले की, रशिया हिंदुस्थानला आपला एक अत्यंत विश्वासार्ह भागीदार मानतो. हिंदुस्थानचे इतर कोणत्याही देशाशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांचे रशियावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत. हिंदुस्थान एक महान राष्ट्र आणि मोठी लोकशाही असून तो नेहमी आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करतो.
हिंदुस्थान सर्व देशांसोबत आपले संबंध विकसित करत असल्याचा रशियाला आनंद आहे, असे पुतिन म्हणाले. दीड अब्ज लोकसंख्या असलेला हा एक महान देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्थाही विशाल आहे. आपल्या हितानुसार आवश्यक वाटणाऱ्या देशांसोबत हिंदुस्थानने आपली अर्थव्यवस्था विकसित करणे हे अगदी स्वाभाविक आहे. हिंदुस्थान औषधनिर्मिती उद्योगात खूप सक्रिय असून रशियाचे आर्थिक संचालक अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यास तयार आहेत. दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या दीर्घकालीन योजनांची रूपरेषा आधीच तयार करण्यात आली आहे.
St. Petersburg: On the impact of US-India relations on India-Russia relations, Russian President Vladimir Putin says, “Another thing is that the US are trying to put pressure on India in some matters. For example, when it comes to cooperation with Russia on some tracks. But… pic.twitter.com/FW2V7Y0oZ6
— ANI (@ANI) June 4, 2026





























































