‘नीट’ पेपरफुटीचा धसका; पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस नाही, नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा धसका घेतला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी (१८) या विद्यार्थिनीने नागपुरात आत्महत्या केली.
मूळची मध्य प्रदेशच्या मऊगंज येथील रहिवासी असलेली आकांक्षा ही नागपुरात नीट परीक्षेच्या तयारीसाठी एका कोचिंग संस्थेत तयारी करत होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात भावनांना वाट मोकळी करत तिने म्हटले की, तुमची मुलगी डॉक्टर बनेल, असा तुम्हाला विश्वास होता. मात्र आता पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस होत नाही. पहिल्या प्रयत्नात चांगले गुण मिळत होते. पण आता पुन्हा चांगली कामगिरी करता येईल, याची कोणतीही गॅरेंटी नाही, असे आकांक्षाने लिहिले आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आकांक्षाची घरची परिस्थिती खूपच हलाकीची होती. आकांक्षाचे वडील कृष्णकुमार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी ते नागपुरात एका ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम करत होते. त्यांनी तीन लाख रुपयांचे कर्जही घेतले होते.