
युगांडाहून राजस्थानात आलेल्या एका परदेशी महिलेला इबोलासारखी लक्षणे आढळलेली आहेत. ही महिला युगांडा हून शारजामार्गे जयपूरला पोहोचली होती. तिला तत्काळ जयपूरच्या आरयूएचएस रुग्णालयात दाखल करत क्वारंटाइन करण्यात आले असून तिचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले.































































