विझाग स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना, वितळलेले गरम लोखंड अंगावर पडल्याने आठ कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील राष्ट्रीय इस्पात निगमच्या विझाग स्टील प्लांटमध्ये (VSP) सोमवारी संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली. प्लांटमध्ये वितळलेले गरम लोखंड अंगावर पडल्याने आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

स्टील मेल्ट शॉपमध्ये उच्च तापमानावर लोखंड वितवळलं जात होतं. त्यावेळी ठिकाणी या भांड्यातून गळती झाली व ते गरम लोखंड कामगारांच्या अंगावर पडले. वितळलेले उष्ण लोखंड खाली सांडल्याने तिथे अचानक मोठी आग लागली. यात आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.