
एचडीएफसी बँकेने बदनामी केल्याचा आरोप करणाऱ्या लीलावती ट्रस्टला उच्च न्यायालयाने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम बॅंकेला द्यावी, असे आदेशही न्यायालयाने ट्रस्टला दिले आहेत.
बॅंकेने व त्यांच्या अधिकाऱयांनी ट्रस्टची नाहक बदनामी केली आहे. आमची बदनामी होईल, असे भाष्य करण्यास बॅंकेला व त्यांच्या अधिकाऱयांना मनाई करावी, अशी विनंती करणारा अर्ज ट्रस्टने दाखल केला होता. न्या. सोमशेखर सुंदरसेन यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. बॅंकेने ट्रस्टची बदनामी केलेली नाही, असा निर्वाळा देत न्यायालयाने ट्रस्टचा अर्ज फेटाळला.






























































