
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू झाला. याघटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून ठेकेदाराने निविदा होण्यापूर्वीच पुलाचे काम ॲडव्हान्स सुरू केल्याची माहिती उघडकीस येत आहे. तसेच ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदीवर ॲडव्हान्स काम चालू असताना शाखा अभियंता आणि जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुर्धे येथील लिंगायतवाडी आणि खोताचीवाडी येथील नदीवरील पुलाच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून मुकादम अक्षय काटे यांचा मृत्यू झाला. याघटनेनंतर परिसरात पुलाच्या बांधकामाबाबत संताप व्यक्त करण्यात आला. पुलाच्या कामासाठी सुमारे ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता मात्र निविदा प्रक्रिया झाली नव्हती. तरीही ठेकेदाराने ॲडव्हान्स काम सुरू केले.ठेकेदाराचा आगाऊपणा सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाच्या जीवावर बेतला आहे.




























































