
मोदी सरकारने किरकोळ पेट्रोल पंपांवरून होत असलेल्या डिझेल खरेदीवर निर्बंध घातले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना एका दिवसात 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. तसेच कारखाने व व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ विक्री केंद्रातून इंधन मिळणार नाही, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत.
मोदी सरकारने काढलेल्या आदेशानुसार ‘मोटर स्पिरिट अॅण्ड हाय स्पीड डिझेल (टेम्पररी रेग्युलेशन ऑफ सप्लाय थ्रू रिटेल आऊटलेट्स) ऑर्डर, 2026’ जारी केला आहे. हे निर्बंध 90 दिवसांसाठी लागू असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.


























































