
रोहित शर्माने पहिल्या वनडेमध्ये सलामीवीर म्हणून 16 हजार धावा पूर्ण केल्या आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवागला मागे सोडले. भारताकडून सलामीवीर म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित हा आता अव्वल खेळाडू ठरला आहे. सेहवागच्या नावावर 15,758 तर सचिनने 15,335 धावा होत्या. रोहितच्या नावावर आता 16,010 धावा आहेत.
























































