दोन चिमुकल्यांनी घेतला कचराकुंडीतच अखेरचा श्वास; मुंब्यातील घटनेने माजीवडा, ठाणेकर सुत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आईच्या कुशीत राहून कोडकौतुक होण्याऐवजी ठाण्यात दोन नवजात चिमुकल्यांनी कचराकुंडीतच अखेरचा श्वास घेतला. माजीवडा आणि मुंब्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. या घटनेने ठाणेकर सुन्न झाले आहेत.

पहिली घटना माजीवड्यात घडली. अॅथेना सोसायटीच्या ‘ई’ विंगच्या २६ व्या मजल्यावरील कचऱ्याच्या डब्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला नवजात अर्भकाचा मृतदेह टाकण्यात आला होता. स्वच्छता कर्मचारी मारुती कडूला हा प्रकार दिसला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मारुती कडू यांना हे दृश्य पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने सोसायटीचे व्यवस्थापक प्रकाश पांडियन यांना सांगितले. पांडियन यांनी पोलिसांकडे तक्रार करताच ते घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र ते मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दुसरी घटना मुंब्रा परिसरातील सुमनताई शाळेजवळील कचरापट्टीत उघडकीस आली. या कचरापट्टीजवळील गवतामध्ये एक अर्भक टाकून दिले असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अर्भकाला कळवा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

निर्दयी मातांचा शोध

या दोन्ही घटनांमध्ये अर्भकांचा जन्म झाल्यानंतर त्यांना लगेचच बेवारसपणे टाकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या निष्पाप जिवांना टाकून देणाऱ्या निर्दयी मातांचा शोध पोलीस घेत आहेत.