
बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेची बँकेच्या व्यवस्थापनासोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनुकंपा नियुक्ती योजना, पदोन्नती धोरण, वैद्यकीय आपत्कालीन सहाय्यता, आंतर-क्षेत्रीय बदली धोरण, घरभाडे सुविधा यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीत अधिकारी व कर्मचारीवर्गाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांसह महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा सेना युनियनचे सरचिटणीस विनोद निकम व सेना वुमेन्स विंग सरचिटणीस दीपाली जैन, विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस दिनेश बोभाटे आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्ता चांद आदी उपस्थित होते.




























































