
बीएलओ ड्युटी अन्याय निवारण मंचातर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांना दिल्या जाणाऱया बीएलओ डय़ुटीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंचाने या सभेचे आयोजन केले असून 20 जून रोजी दुपारी 2 वाजता गोरेगाव पूर्वेतील नंदादीप विद्यालयाच्या भानुबेन नानावटी कलाघर येथे ही सभा पार पडणार आहे.
बीएलओ डय़ुटी अन्याय निवारण मंचातर्फे कायद्याला धरून नसणाऱया बीएलओ डय़ुटीच्या अन्यायकारक आदेशांना तसेच डय़ुटीवर रुजू न होणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या कृतींना विरोध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडणार असून या सभेला मुमबी शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे देविदास पंडागळे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ व दि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय नाईक व दि शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष गिरीश सामंत हे या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.



























































