
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 2026-27 या वर्षासाठी प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीची घोषणा केली असून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 1,500 रिक्त जागांसाठी भरती होईल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया गुरुवार, 18 जूनपासून सुरू झाली असून 8 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येईल. तीन टप्प्यांत मेगाभरती प्रक्रिया पार पडेल. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार एसबीआयच्या करिअर पोर्टलवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. पूर्वपरीक्षा ऑगस्टमध्ये तर मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल. परीक्षेचा अंतिम निकाल नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घोषित होईल.



























































