
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रकृतीची काळजी घ्या
बुध राश्यांतर, सूर्य चंद्र लाभयोग. कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. धंद्यात लाभ होईल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 24, 25
वृषभ – वादाचे प्रश्न वाढवू नका
बुध राश्यांतर, शुक्र, शनि त्रिकोण योग. प्रवासात घाई नको. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. नावलौकिक होईल. वादाचा प्रश्न वाढवू नका. नोकरीत वरिष्ठांचे प्रश्न मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 21, 22
मिथुन – कामाची प्रशंसा होईल
बुध राश्यांतर, शुक्र शनि त्रिकोणयोग. आळस करू नका. कामे मार्गी लावा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. योजना पूर्ण करा. शुभ दि. 22, 23
कर्क – नोकरीत चूक टाळा
बुध राश्यांतर, शुक्र शनि त्रिकोणयोग. आत्मविशवास, उत्साह वाढेल मात्र अहंकार दूर ठेवा. कायदा पाळा. क्षुल्लक कारणाने गैरसमज होतील. नोकरीत चूक टाळा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दि. 21, 22
सिंह – जास्त अपेक्षा ठेवू नका
बुध राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणोग. तुम्हाला मोठेपणा देऊन इतर चुकीच्या गोष्टी घडत नाही ना, याकडे लक्ष द्या. नोकरीत स्पर्धा वाढेल. जास्त अपेक्षा ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रकृती जपा. शुभ दि. 22, 24
कन्या – चौफेर प्रगतीची संधी
बुध राश्यांतर, चंद्र गुरू लाभयोग. प्रत्येक दिवस यशाचा, उत्साहाचा ठरेल. ध्येय गाठा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. परदेशी जाण्याची संधी मिळेल. धंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर प्रगतीची संधी लाभेल. शुभ दि. 24, 25
तूळ – रागावर ताबा ठेवा
बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होतील. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. शुभ दि. 26, 27
वृश्चिक – अहंकार दूर ठेवा
बुध राश्यांतर, सूर्य प्लुटो षडाष्टक योग. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा. अहंकार दूर ठेवा. नोकरीत तणाव टाळा. धंद्यात आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक त्रस्त करतील. आरोप होतील. संयमाने परिस्थिती हाताळा. शुभ दि. 21, 22
धनु – संयमी रहा
बुध राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे सुरूवातीला करा. संयमी कृती, संयमी भाष्य यावर भर द्या. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भावेल. शुभ दि. 21, 24
मकर – तडजोडीचे धोरण ठेवा
बुध राश्यांतर, शुक्र, शनि त्रिकोणयोग. विरोधाला कमी लेखू नका. मेहनत करा. यश मिळवता येईल. नोकरीत कामाचा व्याप राहील. वरिष्ठांची मर्जी राखा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चातुर्य वापरा. तडजोडीचे धोरण योग्य ठरेल. शुभ दि. 22, 24
कुंभ – प्रवासात सावध रहा
बुध राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोण योग. संयम, नम्रता बाळगा तरच यश मिळेल. कोणतीही चूक करू नका. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचार बदलतील. शुभ दि. 24, 27
मीन – मुद्दे प्रभावी ठरतील
बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र लाभयोग. साडेसाती सुरू आहे. यश, अपयश पचवण्याची शक्ती मिळेल. अहंकाराचा अतिरेक करू नका. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. मुद्दे प्रभावी ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना तुमचा मुद्दा पटेल. शुभ दि. 22, 27


























































