
जमिनीच्या वादातून समाजवादी पक्षाचे नेते सेनापती कुंतल आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी पिता-पुत्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सेनापती यांचा मृत्यू झाला, तर मुलावर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील रिफायनरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी जखमी झाला आहे. मुख्य आरोपी योगेंद्र पैलवान याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दुसरा आरोपी समय सिंग यालाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक कार, लोखंडी सळई, दोन गावठी पिस्तूल आणि जिवंत तसेच वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.























































