बाबा बर्फानींची पहिली पूजा संपन्न, 3 जुलैपासून यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी सोमवारी बाबा बर्फानींची पहिली पूजा संपन्न झाली. या वेळी जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी पूजेत भाग घेतला. या वर्षी 3 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होईल. 15 एप्रिलपासून आतापर्यंत 4 लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली.