
लंडन येथील मोठय़ा तंबाखू कंपनीपैकी एक ब्रिटिश अमेरिकन टोबॅको 20 टक्के म्हणजेच जवळपास 9 हजार कर्मचाऱयांना कामावरून काढणार आहे. कंपनीत सध्या एकूण 47 हजार कर्मचारी आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 5,500 नोकऱया रद्द करेल आणि 3,500 इतर पदे आउटसोर्स केले जातील. ज्यामुळे एकूण 9,000 कर्मचाऱयांवर परिणाम होणार आहे.




























































