
मराठी -बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील प्रकाश बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाच्या कार्याध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे पार पडलेल्या महासंघाच्या बैठकीला महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, कार्याध्यक्ष संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष अजित मराठे, गजेंद्र पवार, सहसचिव संदीप कोल्हटकर, खजिनदार बाबासाहेब भोसले, नितीन देशपांडे, मकरंद केळकर, संजय मोरे, अनिल घनवट, सुभाष तमखाने, सचिन चुमडे, समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.



























































