Mumbai News – शाळेच्या बसवर झाड कोसळून चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वरुणराजाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली असून पावसाची संतताधार सुरू आहे. याच दरम्यान चेंबूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळलं असून या दुर्घटनेत 11 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी बसने आपआपल्या घरी निघाले होते. घरी जात असताना चेंबूर परिसरात बस आली महाकाय झाड अचानक बसवर पडलं. चेंबूरच्या रोड क्रमांक 11 वर सदर अपघात झाला आहे. पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर पडल्याने बसचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात 12 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. बस कंडक्टर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने 12 विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णालायत दाखल करण्यात आलं. चार विद्यार्थी किरकोळी तर 11 वर्षांचा विहान श्रीवास्तव गंभीर गंभीर जखमी होता. त्याच्यावर झेन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने दुपारी साडेचारच्या सुमारास विहानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विहानच्या अचानक जाण्याने श्रीवास्तव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.