आठवडाभर राज्यात मुसळधार बरसणार; विदर्भ, मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता कोकण, मुंबई, ठाण्यासह राज्यात मॉन्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे परिसरात सकाळपासून पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसत आहेत. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे आठवडाभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

3 ते 7 जुलैदरम्यान राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या काळात विदर्भ, मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.