ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजया मेहता यांच्या निधनाने रंगभूमी पोरकी झाली आहे.

विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा या ठिकाणी झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलं होतं. मराठी नाट्यविश्वात त्यांना आदराने ‘बाई’ म्हणून ओळखलं जायचं. विजयाबाई यांनी विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडवले आहेत.