
सध्या कोणतीही गोष्ट झाली की भाजपचे लोकं त्याचे श्रेय देवाभाऊंना देऊन मोकळे होतात. देवाभाऊंनी हे केले, देवाभाऊंनी ते केले, असे सांगतात. ही चापलुसीची हद्द आहे. जर हे श्रेय देवाभाऊंना देत असाल तरा राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, त्याचे श्रेयही देवाभाऊंना द्यायला हवे. जर बाकीच्या गोष्टीच जर देवाभाऊला क्रेडिट देतो तर वाढत्या गुन्हेगारीचे क्रेडिटही देवाभाऊंना दिलं पाहिजे. भाजपने हे सगळं कबूल केलं पाहिजे, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुनावत भाजपची बोलती बंद केली आहे.
सभागृहात कोणी आलं की देवा भाऊनी असं केलं, आता कोणतरी ठराव मांडला की देवा भाऊमुळं कांबळेला शिक्षा झाली मग देवाभाऊमुळे कांबळेने गुन्हा केला असे का नाही म्हणत? देवाभऊमुळे गुन्हेगार फोफावले असे का नाही म्हणत? गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली ती देवाभाऊमुळे वाढली असे का नाही म्हणत? ही चापलुसीची हद्द आहे. कोणी येतं देवाभाऊमुळे असं झालं ,देवाभऊ काम झाले, देवाभऊ कोर्टात उभे राहिले का? मला असं वाटतं जर आपण बाकीच्या गोष्टीच जर देवाभाऊला क्रेडिट देतो तर या गोष्टीच सुद्धा क्रेडिट देवाभाऊंना दिलं पाहिजे. हे सगळं कबूल केलं पाहिजे म्हणून हे जर देवाभऊनी ते केलं तर हे पण देवाभऊनी केलं, असं म्हटले पाहिजे.
झिरो टॉलरन्स आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो. मात्र, सगळ्यात जास्त लक्षविधी सत्ताधारी पक्षाचे लोक मांडतात. सगळ्यात जास्त सत्ताधारी पक्षाचे लोक मंत्र्यावर आरोप करतात. सगळ्यात जास्त लोक त्या ब्लड बँकेवर आरोप करतात. तर मग त्यांना फासावर का नाही चढवत देवाभऊ? याला देवाभाऊ जबाबदार नाही, मग शिक्षा दिली तर देवाभाऊ आणि गुन्हे झाले तर देवाभाऊ नाही. देवाभाऊ गृहमंत्री आहेत या राज्याचे, हे पण कबूल केलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याला आपण गुड गव्हर्नन्स नाव देतो परंतु आत्ताच्या घडीला गुड गव्हर्नन्स नाही, असे दानवे यांनी ठणकावून सांगितले.
महागाईसारखे सुद्धा मुद्दे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आता बरेच जण सांगतील आज शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचा दोन रुपयाला कांदा घेतला जातो, तो शेतकरी अडचणीत आहे आणि ग्राहकाला तो रुपयाने मिळतो, तो ग्राहक अडचणीत आहे. व्यापारी खुशी म्हणावं तर व्यापाऱ्याला अडचण आहे. रोज संध्याकाळी त्याला जीएसटी भरण्याचं ताण असतो. एखादं चुकलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल का, आपल्यावर कारवाई होईल का, व्यापारी पण अडचणीत आहे. आणि म्हणून मग कोणता घटक या राज्यातला सुखी आहे? कोणताच घटक सुखी नाही, त्यामुळे हे गुड गव्हर्नन्स नाही. सरकारने काही पावलं उचलले पाहिजे का नाही, मात्र, सरकार नुसतं आपल्या मूर्खाच्या नंदनवनात या सगळ्या विषयी वागतंय, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला आणि त्यांची बोलती बंद केली.





























































