
पूर्वी लोन काढण्यासाठी बँकेचे जाऊन तासन्तास उभे राहावे लागत होते. मात्र डिजिटलायझेशनमुळे आता घरबसल्या लोन मिळवणे शक्य झाले आहे.
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. बँकेच्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे घेतलं जाऊ शकतं.
ज्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे त्या बँक किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
तुम्हाला तुमची आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, उत्पन्नाचे पुरावे जोडावे लागतील. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.
डिजिटल कर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ होईल.






























































