सप्तशृंग गड घाटात दरड कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदूर ते सप्तशृंग गड घाट रस्त्यावर शुक्रवारी दुपारी संततधार पावसाने मोठी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. सुमारे पाच ते सहा टन वजनाची ही दरड होती, सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर एकही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पोकलेनच्या मदतीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. वारंवार दरड कोसळत असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण घाट मार्गातील संरक्षक जाळ्या न बसवलेल्या परिसराचे सर्वेक्षण करावे, तेथे दरड प्रतिबंधक उपाय करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.