असं झालं तर…बँक खाते दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करताना पैसे अडकले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– आपले खाते दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करताना पैसे अडकले किंवा उशीर झाला, तर सर्वात आधी शाखेच्या मॅनेजरला किंवा मुख्य व्यवस्थापकाला लेखी अर्ज द्या.

– तुमच्या मूळ शाखेत किंवा ज्या शाखेत खाते ट्रान्सफर करत आहात, तिथे लेखी तक्रार देऊन पोहोच पावती घ्या. बँकेचे हेड कार्यालय येथेही तक्रार नोंदवा.

– बँकेच्या अधिकृत कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. बँकेने 30 दिवसांत उत्तर दिले नाही, तर रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाशी संपर्क साधा.

– RBI Complaint Manage System या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. खाते हस्तांतरणाला उशीर झाल्यास, बँक तुम्हाला विलंबासाठी भरपाई देण्यास जबाबदार असते.

– खाते एका शाखेतून दुसऱया शाखेत ट्रान्सफर करण्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.