
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशाचे पोर्टल बंद झाल्याने बॅचलर ऑफ कॉस्ट अकाऊंट या पदवी अभ्यासक्रमाचे स्वप्न पाहणाऱया कल्याणमधील 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षदा वळवी (रा. सह्याद्रीनगर, कल्याण पश्चिम) असे तिचे नाव असून गेली दहा दिवस जेजे रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी तिची सुरू असलेली झुंज आज संपली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षदाने कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.




























































