रायगडात आभाळ फाटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वांनाच धू धू धुतले. मात्र रामगड जिल्ह्यात अक्षरशः आभाळ फाटले आहे. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या कोपल्या असून नागोठण्याला पुराचा वेढा पड़ला आहे. येथील बाजारपेठा व घरांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. कर्जतमधील ५० गाांचा संपर्क तुटला असून पनवेलमध्ये पुरात अडकलेल्या २५९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रोह्यात एका फार्महाऊसमध्ये मौजमजा करण्यासाठी पर्यटक आले होते. पण ते पावसाच्या कचाट्यात सापडले. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एकीकडे रायगडला पावसाने झोडपले असतानाच दुसरीकडे पालघर व ठाणे जिल्ह्यात मात्र दिवसभर रिमझिम होती. रविवारची सुट्टी आणि त्यात पाऊस. त्यामुळे ठाणे व पालघरवासीयांनी संडे मूड सेलिब्रेट केला.

बाजारपेठ पुरात बुडाली
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला पूर आला असून त्याचे पाणी नागोठणे शहरात शिरले आहे. येथील एसटी स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला मटण मार्केट, हॉटल लेक ब्यूव्ह परिसरात तुफान पाणी असल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. मुख्य बाजारपेठ बुडाल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही भागांतील बीजपुरवठादेखील खंडित झाला होता.

खोपोलीत दरड कोसळली
मुसळधार पावसामुळे खोपोलीच्या सुभाषनगर भागात आज सकाळी दरड कोसळली. या परिसरातील घरापर्यंत दगड, गोटे, माती वाहून आली. मात्र दैव बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुभाषनगरमधील तीन हजार रहिवासी डोक्यावर टांगती तलवार ठेवून येथे राहात आहेत.

जिना कोसळला
दिव्यातील सायेगाव येथे दुमजली इमारतीचा जिना कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. अग्निशमन दलाने उंच शिडी लावून पाच रहिवाशांची सुरक्षित सुटका केली.

वादळी वाऱ्याने पत्रे उडाले घणसोलीच्या
सेक्टर १० मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बादळी वाऱ्याने पत्रे उडाले. त्याखाली चार वाहने अडकली, सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी व महाराष्ट्र सिमलेस जिंदाल कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली. पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली

कर्जतमध्ये रस्ते बंद, वाहतूक ठप्प
तुफानी पावसामुळे कर्जत तालुक्यातील पूल पुरात बुडाला असून रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे बहतूक ठप्प झाली. दहिवली पुलावर उल्हास नदीचे पाणी आल्याने ५० गावांचा संपर्क तुटला. करोळी नाक्याजवळ मोठे झाड कोसळल्याने संपूर्ण रस्ताच बंद झाला आहे. उमरोली परिसरातील डोंगराचा वरही भाग खचला.

डोंबिवलीतील भिंत कोसळली; 32 कटुंबांचे स्थलांतर

डोंबिवलीच्या टिळक रोड परिसरात पालिकेच्या कॅन्नार रुग्णालयाच्या बेसमेंटसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान शेजारील दोन इमारतींची संरक्षक भिंत अचानक कोसळली. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही इमारतीतील ३२ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाकडून दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. इमारतींची दुरुस्ती झाल्यानंतर रहिवाशांना पुन्हा त्यांच्या घरांमध्ये परतण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.