…तर कुर्ला, चुनाभट्टीला पुराचा धोका, विहार आणि तुळशी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे विहार आणि तुळशी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुंबईतील कुर्ला, चुनाभट्टी या सखल भागांना पूराचा धोका वाढू शकतो.

विहार तलावाची ओसंडून वाहण्याची क्षमता ८०.१२ टीएचडी आहे. सध्या विहारची पाण्याची पातळी ७९.७२ टीएचडी पर्यंत पोहोचली आहे. तुळशी तलाव पूर्ण भरण्याची टीएचडी पातळी १३९.१७ आहे.

 

सध्या तुळशी तलावाची पातळी १३०. ०८ टीएचडी स्तरापर्यंत पोचली आहे. मुंबईत ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, ते पाहता मंगळवारी रात्री किंवा बुधवारी दोन्ही तलाव भरून वाहतील. त्यामुळे खालच्या भागात पाण्याचा धोका वाढेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बांगर म्हणाले.

जर तलाव ओव्हरफ्लो झाला तर त्याचे पाणी मिठी नदीत जाते. त्याचवेळी तर भरती असेल तर कुर्ला, चुनाभट्टीमध्ये पाणी भरते. विहार तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या जवळ आहे. बुधवारपासून पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. पुढे काय होतंय बघूया.
अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त