
“शतकांपूर्वी गुजरातचे व्यापारी आणि सूफी संत समुद्रमार्गे इंडोनेशियात आले आणि त्यांनीच आपल्यासोबत इस्लामचा विचार आणि इस्लामिक जीवनशैलीची मूल्ये या भूमीत आणली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना असे म्हणाले आहेत.
इंडोनेशियाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हिंदुस्थान आणि इंडोनेशिया केवळ समुद्रच सामायिक करत नाहीत, तर आपण आपला इतिहासही सामायिक करतो. आपले संबंध रामायण आणि महाभारताच्या महान वारशात रुजलेले आहेत. बोरोबुदूर आणि प्रंबानन यांसारख्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारकांच्या माध्यमातून आपले दोन्ही देश जोडले गेले आहेत.”
ते म्हणाले, “इंडोनेशियाचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या गरुडच्या माध्यमातून आपण जोडले गेलो आहोत. तसेच बाली जत्रा महोत्सवाचा आनंद आणि उत्साहातूनही दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेले आहेत.”
VIDEO | Jakarta: Addressing the Indonesian Parliament, PM Modi (@narendramodi) says, “India and Indonesia do not just share the sea; we also share our history. Our relationship is rooted in the legacy of the Ramayana and the Mahabharata… We are linked through magnificent… pic.twitter.com/gvsRHwur2x
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2026



























































