
नीट (NEET-UG) पेपरफुटी आणि सीबीएसई (CBSE) मधील गोंधळाच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत. यातच आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी जंतरमंतर येथे जाऊन त्यांची भेट घेतली व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
याचबद्दल X वर पोस्ट करत अरविंद सावंत म्हणाले की, “आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. आज NEET-UG पेपर लीक घोटाळ्याविरोधात सोशल मीडियावरील चळवळीतून उदयास आलेल्या ‘CJP’ (कॉक्रोच जनता पार्टी) च्या माध्यमातून सुरू असलेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीच्या जंतरमंतरवर आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची भेट घेतली.”
ते म्हणाले की, “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून लोकसभेत या विषयावर आवाज उठवणार असल्याबद्दल अभिजीत दिपके, सोनम वांगचुक आणि तमाम आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.”
आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी…
आज NEET-UG पेपर लीक घोटाळ्याविरोधात सोशल मीडियावरील चळवळीतून उदयास आलेल्या ‘CJP’ (कॉक्रोच जनता पार्टी) च्या माध्यमातून सुरू असलेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाचा भाग म्हणून… pic.twitter.com/0GZwqxG4rp— Arvind Sawant (@AGSawant) July 9, 2026





























































