असं झालं तर… शेअर्स खरेदी करायचे आहेत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

१. डिमॅट खात्याचा वापर शेअर्स आणि सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक (डिमॅट) स्वरूपात ठेवण्यासाठी केला जातो. यामुळे प्रत्यक्ष शेअर प्रमाणपत्रे बाळगण्याची गरज उरत नाही.

२. कोणत्याही स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहार करण्यासाठी सूचिबद्ध कंपन्यांचे सर्व शेअर्स आणि डिबेंचर्स डिमॅट स्वरूपात रूपांतरित करणे बंधनकारक आहे. 

३. एखाद्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी-विक्री करायची असेल, तर बँक खात्याशी जोडलेल्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे. 

४. जेव्हा गुंतवणूकदार खरेदी-विक्रीची विनंती करतो, तेव्हा डिपॉझिटरी पार्टिसिपंट ती स्टॉक एक्सचेंजकडे पाठवतो. खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या बदल्यात कर्जदेखील घेता येते.  

५. स्टॉक स्प्लिट्स, बोनस इश्यूज, राइट्स, पब्लिक इश्यूज इत्यादी माहितीसह गुंतवणूकदारांची खाती अद्ययावत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसचा (ECS) वापर केला जातो.