
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आजपासून पुढचे पाच दिवस उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेने मोठ्या भरतीचे वेळापत्रक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
जुलै २०२६ मधील मोठ्या भरतीचे (High Tide) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १४ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असणार आहे 🌊
भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा…
सुरक्षित राहा, सतर्क राहा!#MyBMCUpdates #MumbaiRains #Hightide pic.twitter.com/RuhUaPsSFB
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2026
”जुलै 2016 मधील मोठ्या भरतीचे (High Tide) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 14 ते 18 जुलै 2026 या कालावधीत लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असणार आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा. सुरक्षित राहा, सतर्क राहा”, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

































































