मोदी मेलोडी घेऊन इटलीला जातात पण वांगचुक यांना भेटायला वेळ नाही; आझाद मैदानातील आंदोलनात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनांचे हजारो तरुण-तरुणी आझाद मैदानात जमा झाले होते. 20 तरुणांनी लाक्षणिक उपोषणही केले. पंतप्रधान मोदी इटलीला जाऊन तेथील पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट घेऊन जाऊ शकतात, मग वांगचुक यांना उपोषण सोडायला का सांगू शकत नाहीत, असा सवाल यावेळी तरुणांनी उपस्थित केला. तसे फलकही त्यांनी हाती घेतले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली. राजकीय नेता बनण्यासाठीही कायद्याने परीक्षा घ्यावी, त्यांच्या परीक्षेचे पेपर फुटतील तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांच्या यातना कळतील, असा संताप तरुणांनी व्यक्त केला.

आझाद मैदानात गर्दी; मुंबईत 20 जणांचे लाक्षणिक उपोषण

वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांच्या हजारो तरुण-तरुणींनी आज आझाद मैदानात जमले होते. 20 तरुणांनी लाक्षणिक उपोषणही केले. पंतप्रधान मोदी इटलीला जाऊन मेलोनी यांना मेलडी चॉकलेट देऊ शकतात, मग वांगचुक यांना उपोषण सोडायला का सांगू शकत नाहीत, असा सवाल यावेळी तरुणांनी उपस्थित केला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा अशी जोरदार मागणी त्यांनी केली. राजकीय नेता बनण्यासाठीही कायद्याने परीक्षा घ्यावी, त्यांच्या परीक्षेचे पेपर फुटतील तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांच्या यातना कळतील, असा संताप तरुणांनी व्यक्त केला. विविध घोषणा लिहिलेले फलक तरुणांनी यावेळी झळकावले.