FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या कुशीतील यमाल आता त्यालाच भिडणार; वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत अद्भुत योगायोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉलविश्वात कधी कधी असे योगायोग घडतात की ते एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतात. 19 वर्षांपूर्वी युनिसेफच्या एका चॅरिटी फोटोशूटमध्ये लिओनेल मेस्सीने ज्या बाळाला प्रेमाने हातात घेतले आणि आंघोळ घातली होती, तेच बाळ आता त्याच्यासमोर फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उभे ठाकणार आहे. स्पेनचा युवा सुपरस्टार लामिन यमाल आणि अर्जेंटिनाचा महानायक लिओनेल मेस्सी यांच्यातील हा ऐतिहासिक सामना रविवारी न्यू जर्सी येथे रंगणार आहे.

2007 मधील एका फोटोशूटला इतिहासाचा धागा

या विलक्षण कथेची सुरुवात 2007 मध्ये झाली. कॅटलान वृत्तपत्र ‘डियारिओ स्पोर्ट’ आणि युनिसेफ यांच्या विद्यमाने चॅरिटी कॅलेंडरसाठी बार्सिलोनाच्या खेळाडूंसोबत स्थानिक कुटुंबांची छायाचित्रे काढण्यात आली होती. त्यावेळी केवळ 20 वर्षीय मेस्सीला काही महिन्यांच्या लामिन यमालसोबत फोटोशूट करण्यास सांगण्यात आले. त्या छायाचित्रांमध्ये मेस्सी लहानग्या यमालला आंघोळ घालताना दिसत होता. भविष्यात हेच बाळ जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडूंच्या पंगतीत बसेल, याची कल्पना कोणालाच नव्हती.

मेस्सी मॅजिक! अर्जेंटिना अंतिम फेरीत; एकही गोल न करता रचला वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील सर्व बलाढ्य खेळाडूंनाही मागे टाकले

व्हायरल फोटोने पुन्हा उजळली आठवण

ही छायाचित्रे अनेक वर्षे विस्मृतीत गेली होती, मात्र 2024 मध्ये यमालच्या वडिलांनी ती सोशल मीडियावर शेअर केली आणि ती जगभरात प्रचंड व्हायरल झाली. मेस्सीच्या हातातील ते बाळ म्हणजेच बार्सिलोनाचा नवा चमत्कारिक खेळाडू लामिन यमाल असल्याचे समोर आल्यानंतर फुटबॉलविश्व थक्क झाले. त्यानंतर यमालने क्लब आणि देशासाठी अनेक विक्रम मोडत स्पेनच्या नव्या पिढीचा प्रमुख आधार बनला. त्याची अप्रतिम ड्रिब्लिंग, अचूक पासिंग आणि वयापेक्षा अधिक परिपक्व खेळ यामुळे त्याला फुटबॉलचा पुढचा जागतिक सुपरस्टार मानले जात आहे.

यमालच्या घरात चोरीचा प्रयत्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला