
शैक्षणिक सहलीवरून परतत असताना स्कूल बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 विद्यार्थी आणि एका वृद्धाचा समावेश आहे. अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्व युगांडातील कपचोरवा जिल्ह्यात गुरुवारी रात्री हा अपघात घडला. कंपाला येथील किंग डेव्हिड ज्युनियर स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिपी धबधब्यावर शैक्षणिक सहलीवर गेले होते. सहलीवरून परत येताना चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि बस खडकाला धडकून उलटली.
अपघात इतका भीषण होता की बसच्या वरचा भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक मुले गंभीर जखमी झाली असून, त्यापैकी किमान नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.



























































