आषाढी एकादशीनिमित्त रंगणार ‘पहावा विठ्ठल’ सांगीतिक सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीनिमित्त ‘एकदंत प्रतिष्ठान’च्या वतीने ‘पहावा विठ्ठल’ या सांगीतिक सोहळ्याचे आयोजन 25 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे 26वे वर्ष आहे. यंदा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा पुरस्कार मिळवलेल्या गायिका-अभिनेत्री संपदा माने, गायक धनंजय म्हसकर, गायक नचिकेत देसाई आणि गायिका माधुरी करमरकर रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांचे निरूपण या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. प्रशांत लळीत यांचं संगीत संयोजन लाभले असून तबला – निषाद करलगीकर, हार्मोनियम – नीला सोहनी, पखवाज/ढोलक – अनिल करंजवकर, तालवाद्य – महेंद्र शेडगे, बासरी- विजय तांबे व इतर कलाकार या गायक-गायिकांना साथसंगत करतील.