
चप्पल दुरुस्ती व विक्री करणाऱ्याकडे कायदेशीर कारवाई न करण्यासाठी रेल्वे पोलिसाने तीन हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे अंमलदार सुधीर वाघमारे यांच्याविरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार सुधीर वाघमारे यांनी चप्पल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास संपर्क साधून तुम्ही वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगत पोलीस ठाण्यात भेटण्याकरिता बोलावले. त्यानुसार ते वाघमारे यांना भेटले असता मी तुला सोडतो, तू जर कोर्टात गेलास तर १५ हजार जामिनासाठी आणि पाच हजार वकिलाची फी द्यावी लागेल. त्यापेक्षा मला १० हाजार रुपये दे, अशी मागणी केली.



























































