34 दिवसांनंतर मोदींची पोस्ट, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चावर केलेल्या लाठीमारावरून देशातील वातावरण तापलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 दिवसांनी मौन सोडत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. पेपरफुटीतील दोषींना शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येतील. तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमधून केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पोस्टला उत्तर दिले आहे. आधी विद्यार्थ्यांची माफी मागा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केली.