अणुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली; पोलीस आणि बांधकाम विभागाने दरड हटवली, वाहतूक सुरळीत सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करून मध्यरात्रीच एकेरी वाहतूक सुरू केली.

मंगळवारी रात्री सुमारे एकच्या सुमारास अणुस्कुरा घाटातील रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने रस्त्यावर दगड व मातीचा ढिगारा साचला होता. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेली दरड बाजूला केली.

बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित दरड हटवून रस्ता पूर्णपणे स्वच्छ केला. त्यामुळे अणुस्कुरा घाटमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.