Photo – समांथा प्रभूच्या मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चा; मस्टर्ड यल्लो ड्रेसमधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने नुकतीच तिच्या प्रेग्नेसीची घोषणा केली असून, सध्या ती या सुंदर पर्वाचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी समांथा आणि तिचा पती राज निदिमोरू यांनी लवकरच आई-वडील होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून चाहते खूप खूश आहेत. याच दरम्यान, समांथाने तिचे एक सुंदर मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या फोटोंमध्ये समांथा खूपच सुंदर दिसत असून तिच्या साध्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमध्ये तिने मस्टर्ड यल्लो रंगाचा मिडी ड्रेस घातला आहे. त्यात तिने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.   

विशेष म्हणजे समांथाने’क्वा क्लोदिंग’ ब्रँडचा ‘कोकून केप ड्रेस’ परिधान केला आहे, ज्याची किंमत 4 हजार 995 रुपये इतकी आहे. ब्राइट मस्टर्ड रंगाचा हा ड्रेस मॉडर्न मॅटर्निटी स्टाइलचे उत्तम उदाहरण आहे. स्ट्रेट-फिट मिडी ड्रेसच्या दोन्ही बाजूंना एक स्पेशल ड्रिपिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे तो केपसारखा दिसतो.

या ड्रेसच्या केप इफेक्टमुळे तिच्या लूकला एक वेगळाच ग्रेस  मिळाला आहे. हा ड्रेस घालून तिने फॅशनचा एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. या ड्रेसवर तिने ग्रीन स्ट्रॅप्सच्या हाय हील्स आणि स्मूथ साईड-पार्टेड हेअरस्टाइल केली आहे.

तसेच ॲक्सेसरीजमध्ये तिने आपली मैत्रीण आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या ब्रँड कलेक्शनमधील ब्लू स्टोन असलेले सुंदर झुमका-स्टाईल गोल्ड इयररिंग्स घातले आहेत. हलका ब्राऊन स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिकने तिच्या या संपूर्ण लूकला चार चाँद लावले आहेत.