सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या रखडपट्टीचा प्रवाशांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ देण्यात आली आहे. फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची मुदत 21 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे दादर आणि ठाणे येथे काही मेल/एक्सप्रेस गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 16 आणि 17 वर पायाभरणी आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्र. 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्र. 22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस या गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी ठाणे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.