अभिषेक बच्चनच्या सोबतीने अजिंक्य रहाणेची नवी इनिंग; आता धमाका होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शांत, संयमी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या अंजिक्य रहाणेने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर त्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता पुढे काय करणार, कोणत्या भुमिकेत दिसणार? याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. चाहत्यांच्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण अजिंक्य रहाणे आता युरोपियन टी20 प्रीमियर लीगमध्ये (European Premier League) खेळताना दिसणारा आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चाहत्यांना अपेक्षा होती अजिंक्य आता आपला अनुभवाचे धडे प्रशिक्षकाच्या रुपाने नव्या दमाच्या खेळाडूंना देईल किंवा समालोचकाची जबाबदारी पार पाडताा दिसेल. मात्र, बॅटशी असलेलं त्याच नात इतक्यात संपुष्टात येणार नाहीये. युरोपियन टी20 प्रीमियल लीग 2026 च्या पहिल्याच हंगामात अजिंक्य रहाणे चौकार-षटकारांची बरसात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या लीगमध्ये अजिंक्य रहाणे नेदरलँड्सस्थित ‘अमस्टरडॅम फ्लेम्स’ संघाकडून खेळताना दिसेल. मारकी प्लेअर म्हणून त्याची निवड करण्यात आली असून फ्रँचायझीने त्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शच्या नेतृत्वात अमस्टरडॅम फ्लेम्स संघ मैदानात उतरेल. अमस्टरडॅम फ्लेम्सचे मुख्य क्रिकेट अधिकारी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दिग्गज स्टीव्ह वॉ तसेच सह-मालक अभिषेक बच्चन यांनी रहाणेच्या आगमनाचे स्वागत केले आहे. त्याच्या अनुभवामुळे युरोपियन क्रिकेटमधील नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.