
फेसबुक, इन्स्टाग्राममुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामामुळे न्यू मेक्सिकोमधील एका न्यायालयाने मेटावर तब्बल 567 दशलक्ष डॉलर्स अर्थात 5 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीची जबाबदारी निश्चित करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायाधीश ब्रायन बीडशेड यांनी आपल्या निकालात म्हटले की, दंडाच्या रकमेचा मोठा भाग, म्हणजेच 420 दशलक्ष डॉलर हे तरुणांच्या उपचारांसाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम पुढील पाच वर्षांसाठी जागरूकता, प्रतिबंध आणि स्क्रीनिंग सेवांवर खर्च केली जाईल. पंपनीच्या प्लॅटफॉर्मचा मुलांवर नकारात्मक परिणाम झाला आहे, असे कोर्टाने नमूद केले.




























































