मुसळधार पावसामुळे जम्मूमध्ये अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांच्या संख्येत घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे जम्मूमध्ये अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जम्मूमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून पुढील काही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येतही घट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवामानाची स्थिती आणि भाविकांची सुरक्षेची खातरजमा केल्यानंतरच जम्मू तळावरून यात्रेकरूंना पुढील यात्रा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात जाईल. भगवती नगर बेस कॅम्पमधून शनिवारी यात्रेकरूंचा कोणताही गट काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाला नाही, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.